Wednesday, 7 December 2011

कॅलिग्राफीच्या निमित्ताने...

खूप वर्ष मनात असलेली एक इच्छा नुकतीच पूर्ण झाली.
जगप्रसिद्ध कॅलिग्राफीकार अच्युत पालव यांच्या कडून कॅलिग्राफी शिकण्याची... 
कॅलिग्राफी या प्रकाराशी ओळख नेमकी कधी झाली आठवत नाही.
पण, पाटी-पेन्सिलची साथ सुटली आणि हाती आलं ते शाई पेन!
पहिल्या भेटीतच 'शाई पेन' या भन्नाट गोष्टीच्या मी अक्षरशः प्रेमात पडले...
तेव्हा धरलेलं शाई पेनचं बोट अगदी शाळा सुटेपर्यंत सोडलं नाही... शाई पेन वापरलं की अक्षर छान येतं हे ऐकलं होतं. माझं अक्षर मुळातच बरं होतं, आपण शाई पेन वापरलं तर अक्षर सुंदर होईल म्हणून माझी शाई पेन वरची निष्ठा ढळली नाही.
तर असंच कधी तरी शाई पेन वापरताना त्याचं निब तुटणे हा प्रकार घडला... आणि त्या अद्भुत क्षणी हे निब कापून त्याचं टोक जाड करून लिहून पहावं हे डोक्यात आलं... तोच तो नेमका क्षण, ज्याने माझी कॅलीग्राफिशी ओळख करून दिली. त्या नंतर बाजारातून खंडीभर निब्स आणून विविध angle मध्ये त्यांना कापून वेगवगळ्या  टायीप मध्ये लिहिण्याचा छंद लागला...
शेवटी माझ्या मम्मीने कुठूनसा मला 'कॅलिग्राफी सेट' आणून दिला... ''कर काय उद्योग करतेस ते!!!''
आणि मला दिसेल ते सगळं कॅलिग्राफी मध्ये लिहिण्याचा नाद लागला...
अशातच कधी झी मराठी वर (तेव्हा ते अल्फा मराठी होतं...) पावसावरच्या गाण्यांवरचा 'नक्षत्रांचे देणे' पहात होते. एकाबाजूला पावसावरची गाणी सुरु असताना दुसर्या बाजूला एक कुणीतरी अवलिया एका मोठ्या कॅनव्हास वर त्या गाण्यांचे शब्द अशा पद्धतीने चितारत होता, जणू पाहताना वाटावं, त्या पावसाच्या सरी कॅनव्हास वरच कोसळताहेत... माझ्या तोंडून ''वा... सही!! हे काय आहे? कोण आहेत हे?'' वगैरे आनंदाचे चित्कार ऐकून पप्पांनी मला सांगितलं, ते अच्युत पालव आहेत... आणि ते जे करताहेत, त्याला 'कॅलिग्राफी' म्हणतात...
थोडक्यात, ''तू जे करतेस ते नव्हे...'' असं त्यांना सुचवायचं असावं... :)
पण, त्या क्षणीच माझ्या मनात आलं, ''अच्युत पालव... या माणसाकडून हे शिकायला मिळालं तर किती भारी...!!!''
माझी ती इच्छा एवढ्या वर्षांनी पूर्ण झाली!!
एम ए च्या अभ्यासानंतर पुन्हा एकदा 
वर्गात बसून 'शिकण्याचा' अनुभव घेतला. खरंच खूप मजा आली! पालव सरांनी स्वतः 'कॅलिग्राफी' साठी पेन हातात कसं धरायचं इथपासूनच सुरुवात केली.
तीन दिवस, रोज तीन तास शाळेत गेले... कैक वर्षांनी!
गृहपाठ केला. मी अटेंड केलं ते वर्क शॉप फक्त रोमन अक्षरांचं होतं, मला देवनागरी  पण शिकायचं आहे... ''देवनागरी साठीही वर्क शॉप घ्या'' असं म्हटल्यावर सरांनी, ''आधी हे पक्कं येउदे... तरंच त्या वर्क शॉप ला प्रवेश मिळेल..'' असं बजावलं!  त्यातला अधिकार मनोमन सुखावणारा होता...
आता जबाबदारी आहे. नेहमीच्या धबडग्यातून थोडं वेळ कॅलिग्राफी ला देणं खरंच केवढं छान आहे!
नवीन शिकण्याची प्रेरणा नेहमी आपल्याला जिवंत ठेवते, नाही...??
सध्या मी यादी करतीये. नवीन काय काय करायचंय, शिकायचंय...
ज्यातून नवीन आनंद मिळेल... अनुभव मिळतील... माणसं जोडली जातील.
आणि जगण्याची प्रक्रिया निरंतर सुरु राहील...

7 comments:

 1. हेवा हेवा वाटतोय तुझा :)

  >>>नवीन शिकण्याची प्रेरणा नेहमी आपल्याला जिवंत ठेवते, नाही ??

  अगदी बरोब्बर.... आणि स्वत: केलेली काही लिखावट टाकायची होती नं!!! बाकि तुझी पोस्ट वाचताना खरच एक सुंदर लय जाणवत होती... जियो!!!

  ReplyDelete
 2. nice...liked it!! kp penning ur thoughts girl..:) wuld like to c ur work...

  ReplyDelete
 3. Loved it!!! oops...tuzya words madhe sangaycha tar..."wa Sahiii". :)

  ReplyDelete
 4. तन्वी ताई, खूप छान वाटलं तुझी एवढी तत्काळ प्रतिक्रिया बघून! विद्या, संकेत, पूर्वा, समीर, सगळ्यांचे आभार... केलेलं काम (लावलेले दिवे... ;)) कधी तरी करेन शेअर सगळ्यांबरोबर... :)

  ReplyDelete
 5. post mast lihili aahe. hewa....hewa...watto tumcha.....aata chanse prayog pahayla milot.

  ReplyDelete